Bhosari : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मे 2015 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत दापोडी येथे घडली.

केतकी क्षीरसागर (वय 27) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पती कुणाल कमलाकर क्षीरसागर (वय 32), सासरे कमलाकर गंगाधर क्षीरसागर (वय 55), सासू विनोदीनी क्षीरसागर (वय 50), दीर विशाल क्षीरसागर (वय 28), नणंद करिष्मा धीरज चौरे (वय 27, सर्व रा. गणेशनगर, मनपा वसाहत, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2015 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून लग्नात मानपान केला नाही. तसेच स्वयंपाक नीट येत नाही. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 11 लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या अंगावरील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून घेतले. वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.