BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : मातीने भरलेली ट्रॉली अंगावर पडलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

112
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मातीने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उघडताना मातीसह ट्रॉली अंगावर पडली. यात 40 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी (दि. २५) त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथे घडली.

परशुराम पांडुरंग पवार (वय 40, रा. गणेशपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मंदा परशुराम पवार (वय 26) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक कृष्णा शानु राठोड (वय 33, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा ट्रॅक्टर (के ए 33, टी 9616) चालक आहे. महात्मा फुले नगर येथे मातीची वाहतूक करत असताना मातीने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली आरोपीने मयत परशुराम यांना उघडण्यास सांगितले. ट्रॉली उघडत असताना मातीसह ट्रॉली परशुराम यांच्या अंगावर पडली. यामध्ये परशुराम गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.