Bhosari: शिवसेनेच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आज (बुधवारी) आयोजित बैठकीत पदाधिका-यांमध्ये चांगलाच राडा झाला. पदाधिका-यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी होऊन त्याचे पर्यवसान झटापटीत झाल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.

भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेकडे मतदारसंघ घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज भोसरीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एक महिला पदाधिकारी आणि एका पदाधिका-यामध्ये जोरदार वादावादी झाली आहे.

एक पदाधिका-याने माजी खासदारांच्या कार्यशैलीबाबत नापसंती व्यक्त करत विविध आरोप केले. त्याला एका महिला पदाधिका-याने आक्षेप घेतला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. रस्त्यावरच दोघांमध्ये भांडण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like