Bhosari : पीएमपी बसला दुचाकीची धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – पीएमपी बसला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. हा अपघात 28 जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास भोसरी पोलीस ठाण्याच्या समोर घडला.

राहुल नूरजामन शेख (वय 18) आणि कडी सुखचंद शेख (वय 22, दोघे रा. भोसरी) अशी जखमींची नावे आहेत. दुचाकीस्वार राहुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबू बबन दगाबाज (वय 50, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबू पीएमपी बस चालक आहेत. ते 28 जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पुणे-नाशिक रस्त्यावरून पीएमपी बस घेऊन जात होते. त्यांची बस भोसरी पोलीस ठाण्याच्या समोर आली असता बसच्या मागून दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या राहुल याने पीएमपी बसला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार राहुल आणि दुचाकी वर बसलेला त्याचा साथीदार कडी हे दोघे जखमी झाले. यामध्ये दुचाकी आणि पीएमपी बसचे नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.