Bhosari : PMPML च्या 43 विशेष बसनी परराज्यातील नागरिकांना सोडले त्यांच्या इच्छित रेल्वेस्थानकांपर्यंत

Bhosari: PMPML's 43 special buses dropped migrant workers to their respective railway stations

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना भोसरी येथून PMPML च्या 43 विशेष बसने त्यांच्या इच्छित बसथांब्यापर्यंत सोडण्यात आले. यापैकी 23 बस आसामला जाणाऱ्या नागरिकांना उरळी कांचनपर्यंत तर 20 बस बिहारला जाणाऱ्या नागरिकांना पुणे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले. ही सुविधा PMPML व भोसरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परराज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आली.
PMPML च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, समन्वय अधिकारी व पिंपरी मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनील गवळी, भोसरी डेपोचे मॅनेजर शांताराम वाघेरे व भोसरी पोलीस स्टेशनचे पोलिस इन्सपेक्टर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भोसरी येथून सोडण्यात आलेल्या एकूण 43 बसेस पैकी 23 बस आसामला जाणाऱ्या नागरिकांना उरळी कांचनपर्यंत तर 20 बसेस  बिहारला जाणाऱ्या नागरिकांना पुणे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले. या बसेसमधून जवळपास 727 परराज्यातील नागरिकांनी प्रवास केला. या नागरिकांना भोसरी पोलीस व भोसरी BRT च्या वतीने खाऊचे बंद पाकीट तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक अनिरूद्ध सावर्डे, सह.पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड पोलिस अधिकारी वर्पे, गवारी, खरात, सागर जाधव, विधाते, किरण जाधव, नरवडे, योगिता पुंडे, तसेच PMPMLचे अधिकारी काळुराम लांडगे, विजय आसादे, रोहिदास गवारे आदि उपस्थित होते.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like