_MPC_DIR_MPU_III

Bhosari : गर्दी पांगवणाऱ्या पोलिसाला मारहाण; 10 जणांवर गुन्हा, तिघांना अटक

Bhosari: Police beaten by mob; Crime against 10 persons, arrest of three persons

एमपीसी न्यूज – गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्याला दहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी दापोडी स्मशान भूमीजवळ घडली.

सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31, रा. खडकी) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयाज भिकात शेख, गालिब भिकान शेख (वय 28), समीर सलीम शेख (वय 18, सर्व रा. दापोडी) यांना अटक केली आहे. यांच्यासह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई वाघमारे हे पुणे रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास दापोडी स्मशानभूमीजवळ काही लोकांची गर्दी होत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ही गर्दी पांगवण्यासाठी वाघमारे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच आरोपींनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन केले आहे. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 353, 332, 323, 504, 506, 143, 147, 149, 188, 290 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.