Bhosari : किरकोळ वादातून कारची तोडफोड

184

एमपीसी न्यूज – किरकोळ करणाहून झालेल्या वादातून तरुणास दगडाने मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दापोडी परिसरात घडली.

HB_POST_INPOST_R_A

कैलास दशरथ गेंगजे (वय 23, रा. साई अपार्टमेंट, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील भोई याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेंगजे आणि त्यांचा मित्र कारने जात असताना आरोपींनी किरकोळ करणाहून वाद घालत त्यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: