Bhosari : सोशल मीडियावरील पोस्टवर निजामुद्दीन मरकज प्रकरणाबाबत आक्षेपार्ह कॉमेंट टाकणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाबाबत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आशयाची आक्षेपार्ह प्रतिक्रिया सोशल मीडियावरील एका पोस्टवर केल्याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 2) गुन्ह्याची नोंद केली आहे.

संजय शेंडगे (रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विनायक वर्पे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्या पोस्टवर आरोपीने आक्षेपार्ह कॉमेंट लिहिली. या कॉमेंटमुळे मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.