Bhosari : कंपनीच्या गोपनीय माहितीचा अपहार

एमपीसी न्यूज – कंपनी आणि कंपनी उत्पादन याबाबतची विश्वासाने दिलेल्या गोपनीय माहितीचा कंपनीतील चार जणांनी मिळून परस्पर अपहार केला. ही घटना नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2018 दरम्यान एमआयडीसी भोसरी येथे घडली.

दीपक नारायण पतंगे (वय 60, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित पाटील, विजय योगीराज ढवळे, संदीपान देवराव खरात आणि प्रमोदसिंग राजपूत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंगे यांची एमआयडीसी भोसरी येथे कंपनी आहे. सर्व आरोपी त्या कंपनीमध्ये काम करत होते. 1 नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत आरोपींनी पतंगे यांनी यांच्या कंपनी आणि कंपनीचे उत्पादन याबाबतची गोपनीय माहिती आरोपींना दिली. आरोपींनी आपसांत संगनमत करून त्यांच्या कंपनीला नुकसान पोचविण्याच्या हेतूने गोपनीय माहिती, जॉब डिझाईन, गोपनीय डाटा याचा गैरवापर केला. ही बाब पतंगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक एस. एन. आहेर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.