Bhosari: समोर स्पेशल रबडी, कुल्फी आहे, पण….. – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – विविध खाद्यपदार्थीची चव चाखायला देणा-या भोसरीतील ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आज (सोमवारी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जत्रेत खाद्यपर्थाचे मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत. व्यासपीठासमोरील स्पेशल रबडी, कुल्फीचा फलक पाहून ते सगळे स्टॉल आम्हाला खुणावत आहेत. पण, मला आणि महेशदादांना दोघांनाही ‘डायटिंग’ करायचे आहे असे फडणवीस म्हणताच हास्यकल्लोळ उडाला.

_MPC_DIR_MPU_II

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंद्रायणीथडी जत्रेत खाद्यसंस्कृती भरली आहे. आमची अवस्था कशी झाली आहे बघा…आम्हाला स्टेजवर बसवून ठेवले आहे. आणि समोर स्पेशल रबडी, कुल्फी असे लिहिले आहे. ते सगळे स्टॉल आम्हाला खुणावत आहेत. पण, आज मी त्या स्टॉलकडे जाणार नाही. तसेही त्या स्टॉलकडे महेशदादा आणि मी जाणे जरा योग्य होणार नाही. आम्हाला दोघांनाही डायटिंग करायचे आहे. महेशदादा पैलवान आहेत. त्यांची कमावलेली बॉडी आहे, पण मी पैलवान नाही” अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.