BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेश सस्ते

उपाध्यक्षपदी मनोज बोरसे; बँकेच्या सभेत बिनविरोध निवड

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेश सस्ते व उपाध्यक्षपदी मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची नुकतीच सभा झाली. त्यात ही निवड करण्यात आली.

बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजेश दत्तात्रय सस्ते यांच्या नावाचा प्रस्ताव संचालक अॅड. घनशाम खलाटे यांनी सभेपुढे मांडला. त्यास बँकेचे संचालक शंकर मेटकरी यांनी अनुमोदन दिले. तसेच बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी मनोज रघुनाथ बोरसे यांच्या नावाचा प्रस्ताव शंकर मेटकरी यांनी सभेपुढे मांडला. त्यास संचालक गणेश पवळे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने लावंड यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

  • यावेळी माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे, संचालक अॅड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, शंकर मेटकरी, विजय गवारे, सविता मोहरुत, सोनल लांडगे, दीपक डोळस, सीए अमेय दर्वे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष राजेश सस्ते यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्‍वासास पात्र राहून सातत्याने बँकेची सर्वांगीण प्रगती करण्याचे प्रयत्न केले जातील असे सांगितले.

  • उपाध्यक्ष मनोज बोरसे म्हणाले, सभासद, ठेवीदार, आणि कर्जदार यांचेमध्ये बँकेबद्दल जास्तीत-जास्त विश्‍वास वाढीसाठी व सर्व सहका-यांच्या सहकार्याने उत्तम प्रगती करण्याबाबत आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.