Bhosari : आजपासून तीन दिवसीय राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी आणि भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे ही व्याख्यानमाला शनिवार (दि. 10) ते रविवार (दि. 12) या कालावधीत राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्रांगण येथे संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. व्याख्यानमालेत राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

व्याख्यानमालेचे उदघाटन शनिवारी (दि. 10) पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. उदघाटनाच्या सत्रात शिव व्याख्याते प्रा. ज्ञानदेव काशीद यांचे ‘सह्याद्रीच्या कुशीत व्हावा शिवरायांचा जन्म नवा’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे तर प्रमुख पाहुणे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर असणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी (दि. 11) महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे सहसंचालक अनिल गुंजाळ यांचे ‘आनंदाने जगूया, स्वतःला घडवूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर विश्वनाथ कोरडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने असणार आहेत.

रविवारी (दि. 12) व्याख्यानमालेच्या समारोप सत्राचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते होईल. शिवचरित्र प्रसारक अमोल मिटकरी यांचे ‘राजमाता जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील उपस्थित राहणार आहेत.

पालवी, पंढरपूर येथे प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एच आय व्ही बाधित मुलांचे निवासी संगोपन प्रकल्प चालविणा-या संस्थेच्या संस्थापक संचालिका मंगल शहा यांचा यावर्षीचा ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे सांगता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.