BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने व्हॉलीबॉल स्पर्धेत पटकाविले विजेतेपद

101
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले आहे.

लोणावळ्यातील एन.वी.एन महाविद्यालयात नुकत्याच या स्पर्धा पार पाडल्या. भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी परंदवाडीतील इंदिरा महाविद्यालयातील संघाचा 2-0 ने त्यांनी पराभव करुन उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचा 3-0 ने पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयाचा 3-1 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.

संघातील प्रशांत सागर, सद्दाम मुलाणी, कार्तिक खेडकर, अनिस सय्यद, प्रसाद कुंभार, सौरभ दाभाडे, सनी भोसले, सौरभ भोसले, शुभम पठारे, रोहन दाभाडे, सौरभ कोतवाल, अतिश पठारे या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ केला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गणेश चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे, सचिव विश्वनाथ कोरडे, खजिनदार अजित गव्हाणे, विश्वस्त प्रतापराव खिरीड, महाविद्यालयाचे डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य प्रा.डी.वी.पवार, रजिस्ट्रार अश्विनी भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.