Bhosari : रामदास माने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित 

एमपीसी न्यूज – माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे ” उद्योग भूषण पुरस्कार ”  देऊन  गौरविण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील समर्थ फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेल्या राज्यातील विविध क्षेत्रात गौरवास्पद काम करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र रामदास माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना “उद्योग भुषण पुरस्कार ” प्रदान करण्यात आला. यावेळी जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री विनय कोरे , थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ , कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी संभाजी गायकवाड,आशा होमिओपॅथीचे डॉ. बी.एस.भोसले, उद्योजक शिवराज पाटील,राजकुमार देसाई,संस्थापक यशवंतराव पाटील , अध्यक्ष सुहास पाटील आदी उपस्थित होते.

माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र पंरतु व्यावसायानिमित पूणे येथे स्थायिक झालेले व सर्व सामान्यातील एक प्रेरणादायी आदर्श उद्योजक रामदास माने यांनी ध्येयाच्या , कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर साता समूद्रापार पोहोचले आहेत. तसेच त्यांनी रोजगार उपलब्ध करून अनेक शेकडो कुंटुंबीय माने यांनी उभी केली आहेत. माने यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ही भरीव काम केले आहे. गरिब मूलीच्या विवाह सोहळ्यात आहेर म्हणून आधूनिक रेडिमेड शौचालय भेट देवून सामाजिक सेवेचा वसा जपला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा व उद्योग क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रामदास माने यांनी बाल मजूर ( वेटर ) ते आंतरराष्ट्रीय उद्योजक असा प्रवास करताना आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड दिले आहे. रामदास माने यांना अनेक पूरस्कार मिळाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून मोठे व्यावसायिक यश मिळविणार्या व्यक्तीसाठी कोल्हापूर येथील समर्थ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उद्योग भुषण या पुरस्काराचे रामदास माने हे माण तालुक्यातील पहिलेच मानकरी ठरले आहेत.
रामदास माने यांनी भारताबरोबर परदेशात ही नावलौकिक मिळविला आहे. दुसर्याच्या कंपनीत कामाला केलेली सुरुवात आणि सध्या स्वतः ची कंपनी त्यांनी साता समुद्रापलीकडे जाऊन पोहचली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे माण तालुक्यातील अनेक मान्यवरांसह लोधवडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.