Bhosari : बलात्कार प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करून बलात्कार केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी मॅगेझीन चौक येथे घडली.

अमित प्यामप्यारे गोंड (वय 27, रा. शिवगणेश नगर, धावडे वस्ती, भोसरी) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2018 रोजी अमित याने पीडित तरुणीला जबरदस्तीने मॅक्‍झीन चौक, दिघी येथील दीप लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.