Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या आई आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तीन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले. ही घटना दापोडी, बालगंधर्व, सहारा हॉटेल अँड लॉज चतुःशृंगी मंदिराजवळ घडली.

रमेश कोंडय्या दासरी (वय 32, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीने नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2017 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपीने फिर्यादी तरुणीच्या आई व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर तीनवेळा बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला शिवीगाळ करून तिच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.