Bhosari :  मतिमंद महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – मतिमंद महिलेचा गैरफायदा घेत तिला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

शंकर निरभवणे (रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिलेची पिडित बहीण हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी दुपारी आरोपीने पीडित महिलेचा गैरफायदा घेत तिला त्याच्या घरात नेले. आतून दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.