Bhosari : राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये

स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ समाजिनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली होणारे 21 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आले आहे. आता हे संमेलन भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात 21आणि 22 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी केली. पिंपळे गुरव येथील “बंधुता भवन” मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांच्याहस्ते संमेलनाच्या नविन बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य सदाशिव कांबळे, हाजी अफझल शेख, मधुश्री ओव्हाळ, शंकर आधथरे, महेंद्र भारती, प्रकाश जवळकर, संगिता झिंजुरके, प्रा. प्रशांत रोकडे आणि विश्वास रानवडे उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध समुहांची साहित्य संमेलने होतात. मात्र बंधुता साहित्य संमेलनाने आपले वेगळेपण नेहमीच जपले असून सांस्कृतिक चळवळीमध्ये बंधुताचे एक वेगळे दालनच निर्माण केले आहे. नियोजीत 21 वे साहित्य संमेलनही विचारांच्या पातळीवर आपले महत्व अबाधित ठेवून मूल्यविचारांचे बिजारोपण करेल असा विश्‍वास डॉ. पगारिया यांनी यावेळी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.