Bhosari : एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज- भोसरी येथील एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यासाठी सुनीता गवळी, सागर गवळी, स्वप्नील गवळी, नितीन लोणारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भगवान काळे, अनिल फरदाले, वडगिरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापकानी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात केली. शाळेतील बालचमूंनी मोठया उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला.

मुलांनी देशभक्तीपर गीत “ओह इंडिया ओह माय इंडिया ” सादर केले. त्यामध्ये मुलांनी प्रांतानुसार वेशभूषा परिधान केली होती. तिसरी व चौथीच्या मुलांनी ‘ट्रिब्यूट बाय इंडियन आर्मी’ या थिमवर नृत्य सादर केले. देशभक्ती गीतावर 7 वी व 8 वी च्या मुलांनी नृत्य सादर केले. मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.