Bhosari : एस.पी.जी.इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रमास प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एस.पी.जी.इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रमास प्रतिसाद लाभला. सोमवारी ( दि. 03/02/2020) पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर उपक्रम राबविले.

शिक्षिकांनी दोन दिवस अगोदर उपक्रमाचे विषय मुलांना दिले होते. त्यामध्ये घर, घड्याळ आणि स्कूलबस या वस्तू बनवायच्या होत्या. पालकांच्या मदतीने मुलांनी अतिशय छान उपक्रम बनविले होते. पालकांचा प्रतिसाद अतिशय छान होता.

या उपक्रमांमुळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होते. तसेच त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळतो. शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित करून हे उपक्रम त्यांच्याकडून बनवून घेतले.

इयत्ता पहिली- मर्क्युरी, व्हिनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, आणि युरेनस या तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर उपक्रम बनवून आणले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.