Bhosari : आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये ऱ्हिदम डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज – गोवा येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये भोसरी येथील ऱ्हिदम डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक प्राप्त करुन भारतातून सर्वाधिक पदक प्राप्त करण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच मॉडेलिंगमध्ये पुण्याची नक्षत्रा डोंगरे व प्रिया बांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.

प्युपील ऑलिंपिक असोसिएशन ऑप इंडियाच्या वतीने 9 मे रोजी गोवा येथे तिस-या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्याहून 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये भोसरी येथील ऱ्हिदम डान्स स्टुडिओच्या संचालिका रेवती मेथिली तभाणे यांनी सुवर्णपद प्राप्त केले. तसेच तनया चौधरी व प्रिया बंडे यांनीही सुवर्णपदक पटकावले. चॅम्पियनशिप अवार्डचा पहिला मानकरी पुणे संघ ठरला.

बक्षीस समारंभ प्रसंगी प्युपील ऑलिम्पिंक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. महेश मोरे, सचिव महमंद रफी शेख युसुफ, शिवराम भोसले, महाराष्ट्राचे नृत्यक्षेत्राचे सचिव अक्षय करडे व महाराष्ट्राचे मॉडेलिंग क्षेत्राचे सचिव रेवती लोंढे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.