Bhosari rime News : भागीदार व त्याच्या कर्मचाऱ्याकडून तीन कोटीची फसणूक

एमपीसी न्यूज – कंपनी वाढविण्याचे आमिष दाखवून कंपनीत  भागीदारी  घेत विश्वास संपादन करून डायरेक्टर पदावर असताना स्वतःच्याच कर्मचाऱ्यासह मिळून कंपनीची तीन कोटींची (Bhosari rime News) फसणूक केली आहे.हा प्रकार 2015 ते 2017 या दोन वर्षात एमआयडीसी भोसरी येथील ऋतिक टुल्स येथे घडला.

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी येथे तक्रार केली असून आनंद ईश्वरचंद मित्तल (वय 43 रा.वाकड) व तेजश्री भिमशा शेट्टी (वय 37 रा.भोसरी) यांच्यावर (Bhosari rime News) फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bjp News : भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी एकनाथ पवार यांची फेरनियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या कंपनीचा वाढ करण्याचे आमिष दाखवून आरोपी मित्तल याने भागीदारी घेतली, डायरेक्टर पदावर असताना 2015 व 2017 या कालावधीत कंपनीचे तयार झालेले 18 हजार 314 नगांची एकूण 1 कोटी 75 लाख 4 हजार 102 रुपयांच्या चलनावर मित्तल व शेट्टी यांनी परस्पर सही केली.

तसेच कंपनीचे कोटींग मटेरिअल 9 3 हजार 729 नग 1 कोटी 28 लाख 40 हजार 329 रुपयांच्या चलनावरही परस्पर सही केली व ग्राहकाकडून आलेले 3 कोटी 3 लाख 44 हजार 431 रुपयांचे बिल न बनवता परस्पर स्वतःच्या खात्यावर जमा केले.

हा सारा प्रकार बील पुस्तकाच्या पाहणीमध्ये समोर आले. कंपनीकडे असलेल्या संपर्क क्रमांक व इमेलचा वापर करून हा सारा प्रकार कणऱ्यात आला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Bhosari rime News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.