Bhosari : ‘भाई’ न म्हटल्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला रॉड अन् बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज – ‘भाई’ न म्हटल्यावरून तिघांनी मिळून पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला रॉड आणि बॅटने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

अमोल गौतम भालेराव (वय 24, रा. दिघी रोड, भोसरी) असे जखमीचे नाव आहे.त्याने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चंद्रकांत गुरूशांत आयगोळे (वय 24), नवनाथ विश्वनाथ मानवतकर (वय 32), शंकर सिद्धाराम कल्याणी (वय 25, रा. एमआयडीसी भोसरी) या तिघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी भालेराव आणि त्याचा मित्र रविकांत देसाई फुलेनगर येथील पवना कॉम्प्लेक्स येथे बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच फिर्यादी भालेराव आरोपीला ‘भाई’ न म्हणाल्यावरून आरोपींनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

तसेच भालेराव याच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि क्रिकेटच्या बॅटने मारले. यामध्ये भालेराव जखमी झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.