Bhosari : भूगोल फौंडेशन तर्फे प्रतापगड, वाई, महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फौंडेशन तर्फे किल्ले प्रतापगड येथे दुर्गभ्रमण तसेच श्रीक्षेत्र वाई गणपती, महाबळेश्वर येथे प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे किल्ल्याचे संवर्धन, वृक्षसंवर्धन, वाढते प्रदूषण व त्यामुळे बिघडणारा पर्यावरणाचा समतोल याविषयी जनजागृती व प्रबोधन करणारी मोहीम राबविण्यात आली. 
वनविभाग महाबळेश्वर  व वनसमिती प्रतापगड यांच्या  सहकार्याने प्रतापगडावर परिसराची साफसफाई करण्यात आली. गडाच्या पायथ्याशी गडाचा इतिहास व पर्यावरण वाचवा याविषयी मार्गदर्शन व आवाहन करणारा कायमस्वरूपी फलक लावण्यात आला. यावेळी सर्वांना गडसंवर्धन, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण, वृक्षसंवर्धन याविषयी भूगोल फाउंडेशनचे मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी मार्गदर्शन  केले. श्रीक्षेत्र वाई गणपती व श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथेही पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता, वृक्षसंवर्धन याविषयी पत्रके वाटत पर्यावरण संतुलन विषयावर जनजागरण करण्यात आले.

  • या मोहिमेमध्ये महाबळेश्वर  वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित गायकवाड यांचे सहकार्य लाभले. तसेच वनपाल सुरेश मारूती शिंदे व त्यांचे सहकारी वनरक्षक ए बी पाटील, वनरक्षक ए.डी.कुंभार सहभागी झाले होते. निकुंज रेंगे, सुनील काटकर, बाळासाहेब गरुड, गणेश चौधरी, सुनील बांगर, झारखंडे राय, अमित राय, अविनाश खोसे, अरविंद देवकर, सचिन डोरजे, विजय सुतार, दयानंद आदींनी विशेष परिश्रम घेतले. संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे साहेबराव गावडे, जालिंदर शिंनगारे, विशाल शेवाळे, भारती डहाके, कल्पना शिनगारे सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.