Bhosari : विशेष कार्यकारी अधिकारीपदी संजय बोरा यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भोसरी येथील नुपूर जाहिरात एजन्सीचे संचालक संजय बोरा यांची शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. पत्रकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल वृत्तपत्र क्षेत्र तसेच जैन समाजातील व्यक्तींकडून बोरा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जैन महासंघाचे संस्थापक प्रा.अशोककुमार पगारीया, भोसरी जैन संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, जैन काॅन्फरंसचे राष्ट्रीय सदस्य राजेंद्र चोरडीया, विजय कर्णावट, डाॅ. असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. प्रदीप गांधी, डाॅ. जवाहरलाल बळगट, बापुसाहेब गोरे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सागर सांकला आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.