Bhosari : संत निरंकारी मिशनचा बाल संत समारोह उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज- निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज ( Bhosari ) यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे रविवार दि. 28 मे  रोजी पुणे झोन चा बाल संत समागम सकाळी 11 ते 2 या वेळेत संपन्न झाला. या सत्संग समारोहाला दीड हजाराहुन अधिक बाल संत तसेच त्यांचे पालक पुणे जिल्ह्यातील विविध भागातून उपस्थित होते.
लहान लहान बालकांच्या गीत,अभंग,विचार, नृत्य ,नाटिका यांद्वारे निरंकारी सद्गुरूंची शिकवण आणि मिशन ची विचारधारा यांचा एक एक पैलू त्यांच्या जीवनातून प्रगट होताना दिसला. नाटिकांच्या माध्यमातून मिशन रक्तदान,स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण,जल स्वच्छ अभियान यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील अग्रेसर आहे हे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मिशनच्या इतिहास आणि शिकवणुकीवर आधारित प्रश्न मंजुषा, याद्वारे मिशनच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला.

 

Dighi : लग्नाला नकार दिला म्हणून न्यूड फोटो व्हायरल करत महिलेचा विनयभंग

ज्या प्रमाणे एखाद्या बीजामध्ये विशाल वृक्ष होण्याची क्षमता असते , मात्र गरज असते ती त्याला योग्य जमीन ,खत ,पाणी आणि पोषक वातावरण मिळण्याची, परंतु तेच बीज खडकावर पडले तर ते नाश होऊन जाते. त्याचप्रमाणे लहान लहान मुलांनादेखील योग्य संस्कार मिळाले तर ती देखील समाजाला पोषक असे सुजाण नागरिक बनू शकतात अन्यता संस्कारा अभावी समाजाला घातक प्रवृत्ती तयार होताना दिसतात असे उद्गार मुख्य मंचावरून समजावताना  अमृतपाल सिंह यांनी काढले.
निरंकारी मिशनच्या बालसत्संगच्या माध्यमातून लहान वयातच मुलांना प्रेम, नम्रता, परोपकार, सहनशीलता यासारखे मानवीय मूल्ये शिकवली जातात, समाजामध्ये कसे वागावे, कसे राहावे, कसे बोलावे या सर्व गोष्टीचे शिक्षण बालसत्संगच्या द्वारे मुलांना दिले जाते. मिशनच्या आजवर झालेल्या सर्व सद्गुरूंनी आपल्या बाल्यावस्थेतच मिशनची शिकवण आपल्या आचरणातून प्रगट केली.त्यांनी पुढे समजावताना सांगितले कि आपल्या जीवनामध्ये दोन व्यक्तींचे अनन्य साधारण महत्व असते, एक म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई-वडील आणि दुसरे म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनाचा मूळ उदिष्ट काय आहे हे समजावले ते म्हणजे सदगुरु.
 या सत्संग सोहळ्याला आ. मोहन छाब्रा जी ( मेंबर इंचार्ज,दिल्ली) यांचे विशेष आशीर्वाद लाभले. पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सदगुरु माताजींकडे आशीर्वादाची कामना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरिता रावलानी आणि प्रथमेश साक्रूडकर या बालकांनी ( Bhosari ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.