Bhosari : फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून बँकेची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅटवर कर्ज काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे बँकेत सादर करून बँकेतून 16 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते 31 मार्च 2017 या कालावधीत भोसरी येथे घडला.

बँक अधिकारी स्वाती विनायक कुलकर्णी (वय 38, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हितेश सोलंकी, शीतल सोलंकी (दोघे रा. ज्ञानेश्वर पार्क, दिघी रोड, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोलंकी यांचा आळंदी मरकळ रोडवर च-होली खुर्द येथे धनलक्ष्मी हाईट्स येथे एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटवर त्यांना कर्ज घ्यायचे होते. आरोपींनी त्याची बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सारस्वत बँकेच्या भोसरी शाखेतून 16 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्ज मंजूर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे सोमवारी (दि. 28 जानेवारी) भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.