Bhosari : सासरच्यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रशांत दिलीप ढोले (वय 30), शांता दिलीप ढोले (वय 48), दिलीप किसन ढोले (वय 55), दत्त दिलीप ढोले (वय 27, सर्व रा. इंद्रायणीनगर, भोसरी), महादेव बाळासाहेब ढोले, नीलम महादेव ढोले, लक्ष्मी बाळासाहेब ढोले (तिघे रा. भोसरी), इंदुमती बाळासाहेब भोसले, संगीता संजय ढोले (दोघे रा. मोरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी 2013 ते 10 एप्रिल 2015 या कालावधीत फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून हुंड्यापोटी पैसे आणण्याची मागणी केली. महिलेच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. महिलेला स्वयंपाक येत नाही तसेच मुलबाळ होत नाही. या कारणावरून टोमणे मारून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलिसांनी हा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.