Bhosari : शाळेतील क्लार्क महिलेने केला नऊ लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांकडून फी चे पैसे घेतले. त्याची शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंद केली. त्यानंतर शाळेच्या संगणकामधून सर्व पावत्या डिलीट करून 8 लाख 91 हजार 797 रुपयांचा अपहार केला. याबाबत मुख्याध्यापकांनी महिला क्लार्क विरोधात गुन्हा नोंदवला.

अमित बापूसाहेब पाटील (वय 40, रा. पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजश्री देशमुख (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) या महिला क्लार्क विरोधात गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी रोड भोसरी येथे प्रियदर्शनी हायस्कूल आहे. या शाळेत अमित पाटील मुख्याध्यापक असून आरोपी राजश्री क्लार्क म्हणून काम करतात. 2015 ते 14 जून 2019 या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे राजश्री यांनी स्वीकारले. त्याची शाळेच्या संगणकात नोंद केली. पण शाळेच्या नोंद खतावणी रजिस्टरमध्ये नोंद न करता सुमारे 1 हजार 355 पावत्या त्यांनी संगणकातून काढून टाकल्या. त्यामुळे काढून टाकलेल्या पावत्यांचे कोणतेही रेकॉर्ड शाळेकडे राहिले नाही. याचा गैरफायदा घेत त्यांनी एकूण 8 लाख 91 हजार 797 रुपयांचा अपहार करून शाळेची फसवणूक केली.

मुख्याध्यापक अमित पाटील यांना मागील काही दिवसांपूर्वी याबाबत संशय आला. त्यांनी खतावणी रजिस्टर, संगणकातील रेकॉर्ड यांचा तपशील तपासला असता हा प्रकार समोर आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.