Bhosari : भोसरीत आदर्श शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शऩ

एमपीसी न्यूज – भोसरी येथील आदर्श शिक्षण संस्थेत कला, कार्यानुभव, विज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थी हस्तलिखित प्रकाशन सोहळा उत्साहात झाला.

या प्रकाशन सोहळ्यास प्रा. दिगंबर ढोकले, प्रा.दत्तात्रय इंगळे, उज्वला गायकवाड, शिक्षण मंडळाच समन्वयक विक्रम मोरे, माजी नगरसेवक अमृत प-हाड, शाळा प्रमुख व नगरसेविका प्रियंका बारसे, माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या वंदना लढे, बालवाडी विभाग प्रमुख सुषमा कुंभार, पर्यवेक्षिका चित्रा औटी आदी उपस्थित होत्या.

यावेळी प्रा. दिगंबर ढोकले म्हणाले, विज्ञान कथांमधून तुम्हांला प्रखर ता-यांप्रमाणे चमकायचे असेल तर सध्या आपण कोण आहात याने काहीही फरक पडत नाही. हे थॉमस एडीसनच्या बालपणीच्या गोष्टींचा संदर्भ सांगितला.तर प्रा. इंगळे यांनी माणुसकीचे गौरीशंकर गाठण्याचे पाच संकल्प व्यक्त केले.या प्रदर्शऩात विद्यार्थ्यांनी रांगोळ्या स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्प, आदर्श गाव प्रतिकृती, अग्निसूचक यंत्र, पूरसूचक यंत्र, सौर उर्जेवर आधारीत प्रतिकृती अक्षर बाग, टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ, हस्तकलेच्या आकर्षक वस्तू, मातीचे विविध शिल्प, वीजनिर्मिती प्रकल्पाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे चित्रा औटी यांनी आभार मानले. रफिक तांबोळी यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.