Bhosari : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असताना ओमनी कार च्या धडकेत एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 19 मार्च रोजी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर घडला.

 

याप्रकरणी मंगळवारी (दि.14) कालिदास सुभाष लोहार उर्फ पोपळघट (वय 50 रा. वारजे,पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ओमनी कारचालक अबरार फकीर महंमद शेख (वय 42 राजगुरुनगर )  याच्यावर गुन्हा(Bhosari)दाखल केला आहे. या अपघातात सुभाष अंबरऋषी लोहार उर्फ पोपळघट (वय 80 ) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष लोहार हे पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मारुती ओमनी ही कार भारधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत लोहार(Bhosari)यांना धडक दिली. या अपघातात लोहार हे गंभीर जखमी झाले होते. परंतु,दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.