Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे

एमपीसी न्यूज : – पिंपरी-चिंचवड शहरातील विश्वासार्ह आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त( Bhosari )भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांची तर, सल्लागारपदी प्रा. दिगंबर ढोकले,  शामकांत नांगरे, गणपत पाडेकर, बाळासाहेब भोर, नूतन गावडे यांची नियुक्ती झाली.
संचालक मंडळाच्या आज (शनिवारी) झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद आवटे यांनी कातळे यांच्यासह सल्लागारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1 जून 1995 रोजी झाली(Bhosari )आहे. 1 लाख भागभांडवलावर संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली होती. सुरुवातीला संस्थेचे भोसरीगाव कार्यक्षेत्र होते. संस्थेचे व्यवहार वाढत गेल्यानंतर संस्थेला पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द कार्यक्षेत्र मंजूर झाले.
त्यानंतर संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्राचे निकष पूर्ण केले. त्यामुळे मार्च 2020 मध्ये संस्थेस संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर झाले. संस्थेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ प्राप्त आहे. संस्थेची कर्जवसुली 100 टक्क्याच्या आसपास राहिली आहे. संस्थेचे 3 हजार 843 सभासद असून भागभांडवल 2 कोटी 28 लाखांचे आहे.
संस्थेस  सन 2016-17 या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. 2016 पासून दरवर्षी संस्थेस बँको पतसंस्था ब्ल्यु रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. सभासदांसाठी आरोग्य  शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे उपक्रम राबविले जातात. बायपास, किडनीप्रत्यारोपण, ब्रेन ट्युमर अशा  आजारांसाठी सभासदाला आर्थिक मदत केली जाते.  मयत झालेल्या सभासदाच्या वारसासही मदत केली जाते.
सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांची तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाने एकमताने ही नियुक्ती केली. संस्थेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल कातळे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमात गौरी देवरे हीचा एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याबद्दल सभासद पाल्य सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष मुकुंद आवटे, उपाध्यक्ष सुहास गटकळ, संचालक कैलास आवटे, बाळु गुंजाळ, निंबा डोळस,  अॅड. सुर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, गुलाब औटी, वसंत कुटे, मुबीन तांबोळी, संतोष बिलेवार, तज्ज्ञ संचालक शांतीश्वर पाटील, ज्योती हांडे, संगिता इंगळे,  हे संचालक आहेत. तर, नारायण हाडवळे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून सुनिता आवटे या व्यवस्थापक आहेत. लेखनिक, कॅशियर मनिषा वाघोले, प्रणित महाबरे, जयश्री गजरे आणि विद्या बांदल, दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून प्रमिला औटी, वैशाली कुऱ्हाडे, परिष डागा, ज्ञानेश्वर गाढवे हे कामकाज पाहतात. तर, तेजस वाघमारे, बाळासाहेब कराळे सेवक आहेत.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc&ab_channel=MPCNews
Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share