Bhosari crime News: रस्त्यालगत उभ्या केलेल्या ट्रकमधून साडेसात लाखांचे टायर चोरीला

ही घटना बुधवारी (दि. २) रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या सुमारास भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ घडली.

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सात लाख 61 हजार 162 रुपये किमतीचे 160 टायर चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. २) रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या सुमारास भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ घडली.

प्रदीप सोमदत्त शर्मा (वय 34, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांनी त्याचा ट्रक बुधवारी पहाटे भोसरी येथील राजमाता उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रक मधून 7 लाख 61 हजार 162 रुपये किमतीचे ब्रिस्टॉन कंपनीचे वेगवेगळे 160 टायर चोरून नेले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.