Bhosari : ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त; चौघांना अटक, सहा तरुणींची सुटका

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली मॉलमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले. चार जणांना अटक करून सहा स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल भोसरी एमआयडीसी येथे केली.

राजेश उर्फ तानाजी व्यंकटराव कानुरे (वय 29, रा. रुपीनगर, तळवडे), शिवा नाना कोळपे (वय 20, रा. स्पाईन रोड, भोसरी), रितेश सुभाष घटकार (वय 20, रा. स्पाईन रोड, भोसरी), विक्रम व्यंकटराव पलांडे (रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसरी एमआयडीसी येथील स्पाईन सिटी मॉल येथे सिटी स्पा मसाज या नावाने स्पा सेंटर चालवत होते. या सेंटरच्या नावाखाली आरोपींनी तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळणारी काही रक्कम स्वतःसाठी ठेऊन त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली. तसेच सहा स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like