Bhosari : प्रेमात खर्च केलेले पैसे मागत तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – तरुणीसोबत जबरदस्तीने (Bhosari) शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्यासाठी खर्च केलेले पैसे मागत लग्न केले नाही, तर तुझ्या कुटुंबियांना जीवे मारीन अशी तरुणाने धमकी दिली. हा प्रकार 2 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत भोसरी येथे घडला.

बालाजी कल्याण शेडापे (रा. लांडेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने गुरुवारी (दि. 1) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : मावळ वारकरी सेवा समितीच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी (Bhosari) तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी तरुणी घरी एकटी असताना आरोपी जबरदस्तीने तिच्या घरात आला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत त्याने तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी पुन्हा आरोपी हा तरुणीच्या घरी आला. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आतापर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत, ते मला परत कर, असे म्हणून त्याने तरुणीसोबत भांडण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करू असे तरुणीने सांगितले असता आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. माझ्याशी लग्न केले नाहीतर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकीन अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.