Bhosari: शिवसेनेच्या उपनेतेपदी शिवाजी आढळराव-पाटील यांची वर्णी

भोसरी विधानसभेच्या वतीने आढळराव- पाटील यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवाजी आढळराव यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. या त्यांच्या नियुक्तीबद्दल व शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेच्या शिरुर लोकसभा महिला संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, विधानसभेचे प्रमुख धनंजय आल्हाट, जेजुरी देवस्थानचे संचालक तुषार सहाणे, महिला आघाडी संघटिका वेदश्री काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

  • यावेळी उपशहर प्रमुख आबा लांडगे, विधानसभा समन्वयक सर्जेराव भोसले, राहुल गवळी, अनिल सोमवंशी, विभागप्रमुख कृष्णा वाळके, अनिल दुराफे, नामदेव भोसले, दिलीप सावंत, शरद हुले, कैलास नेवासकर, सूरज लांडगे आदी उपस्थित होते.

उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, आतापर्यंत मी खासदार असताना विकासकामांना प्राधान्य देऊन काम केले. संघटनेत काम करण्याची संधी मला प्रथमच मिळत आहे. मी तळागाळात जाऊन शिवसेना वाढविण्याचे काम करणार आहे. तसेच जुन्या ज्य़ेष्ठ शिवसैनिकांना घरी जाऊन भेटणार. कोणाचे समज-गैरसमज असतील तर ते दुर करण्याचे प्रयत्न करणार व पक्षसंघटना वाढविणार आहे. भोसरी विधानसभेमध्ये युतीचा आमदार व येणा-या महानगरपालिकेच्या निवडणुकीकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडुन आणण्यासाठी मी शर्तीचे प्रयत्न करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.