Bhosari : शिवनेर पतसंस्थेतर्फे केरळमधील आपद्ग्रस्तांना 25 हजारांचा मदतनिधी

एमपीसी न्यूज- भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजारांचा मदतनिधी देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

सदर रकमेचा धनादेश उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर कार्यालयातील मुख्य लिपिक अश्विनी नेवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे, उपाध्यक्ष बाळू गुंजाळ, संचालक सुहास गटकळ, अॅड. सूर्यकांत काळे, शांताराम कुंभार, शांतीश्वर पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.