Bhosari : खंडेनवमीनिमित्त झेंडूच्या फुलांची बाजारात आवक; प्रतिकिलो 60 ते 90 रुपये दर

एमपीसी न्यूज- देवीचा जागर, खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची आवक मोठी झाल्याने भोसरी बाजारात झेंडू चांगला फुलला होता. प्रतिकिलो 60 ते 90 रुपये प्रतिकिलो झेंडूचा दर आहे. झेंडूच्या फुलांबरोबर ऊस, लव्हाळा, ज्वारीच्या धाटांनाही मोठी मागणी होत आहे.

नवरात्रोत्सवात घट बसवण्यात आले असून दररोज झेंडूंच्या फुलांची माळ बांधली जाते. त्यामुळे उत्सव काळात फुलांना मागणी आहे. खंडेनवमी असल्याने झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. फुलांच्या माळा, दारांना तोरणे आणि वाहनांना हार घालण्यासाठी झेंडू फुलांचा वापर केला जातो.

_MPC_DIR_MPU_II

खंडेनवमी आणि विजयादशमीला व्यापारी आणि उद्योजकांकडून झेंडूला मागणी असते. फुलांच्या तोरणांनी शोरुम, दुकाने, कारखाने सजवली जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.