Bhosari: सशस्त्र दरोडा आणि वाहनांच्या तोडफोड प्रकरणी सहा जणांना अटक

Bhosari: Six arrested in armed robbery and vandalism case शिंदे यांच्या गळ्याला चाकू लाऊन शिवीगाळ करत शिंदे यांच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले.

एमपीसी न्यूज– एका व्यक्तीच्या घरासमोर जाऊन त्याच्या गळ्याला चाकू लाऊन दरोडा टाकला. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) रात्री साडेअकरा वाजता दिघी रोड, भोसरी येथे घडली.

अभिषेक कांबळे उर्फ बच्चा, सुरज शर्मा उर्फ डॅनी, अक्षय पवार, अनिकेत कोपरे आणि त्याचे दोन साथीदार (सर्व रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सुहास दगडू शिंदे (वय 33, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी शनिवारी (दि.13) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सहा जणांनी मिळून फिर्यादी शिंदे यांना यांच्या राहत्या घराच्या समोर अडवले.

शिंदे यांच्या गळ्याला चाकू लाऊन शिवीगाळ करत शिंदे यांच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या आणि अन्य वाहनांची तोडफोड करून नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.