Bhosari : चोरीच्या गुन्ह्यात सहा जणांना अटक; सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण 2 लाख 28 हजार 464 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

सागर राजू बिराजदार (वय 23), सनी प्रवीण चिवे (वय 20, दोघे रा. कासारवाडी) या दोघांना अटक करून 30 हजार रुपये किमतीचा आयफोन जप्त केला. तर दीपक परशुराम माळी (वय 21, रा. मुंढवा, पुणे. मूळ रा. कर्नाटक) याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने जबरी चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीचे गंठण आणि गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा 95 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

अमोल कैलास माळी (रा. पिंपरी) याला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेले 1 लाख 28 हजार 464 रुपये किमतीचे नऊ मोबाईल फोन जप्त केले. मोटारसायकल चोरणा-या जावेद छोटूमिया शेख (रा. यरोळे, ता. शिरूर) याला अटक करून चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या. चार प्रकरणांमध्ये भोसरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 28 हजार 464 रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी महेंद्र हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, संदीप जोशी, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.