Bhosari Crime News : कारच्या बोनेटवर केक कापून कारची तोडफोड केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारच्या बोनेटवर केक कापला. त्यानंतर कारची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत बर्थडे बॉयसह सहा जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री विठ्ठल पार्क, भोसरी येथे घडला.

विनायक आत्माराम शिर्के (वय 32, रा. विठ्ठल पार्क, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण राठोड आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिर्के कार चालवण्याचे काम करतात. त्यांच्याकडे हुंडाई एक्सेंट (एमएच 14 / जीडी 1579) ही कार आहे. ती कार त्यांनी ओला या ऑनलाईनप्रवासी वाहतूक कंपनीला लावली आहे. शिर्के यांनी त्यांची कार 3 फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता त्यांच्या घराच्या समोर मोकळ्या जागेत पार्क केली.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता काही मुले त्यांच्या कारच्या भोवताली जमा झाली. त्यातील किरण राठोड याचा वाढदिवस असल्याने आरोपींनी केक आणून शिर्के यांच्या कारच्या बोनेटवर ठेऊन केक कापला. त्यानंतर आरोपींनी शिर्के यांच्या कारची तोडफोड केली आणि पळून गेले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.