Bhosari : एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

एमपीसी न्यूज- भोसरीच्या एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि 29 जानेवारी ) विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावरील वैज्ञानिक प्रयोग सादर केले.

दुसरीच्या मुलांनी पौष्टीक पदार्थांचे नमुने सादर केले होते. तिसरी व चौथीच्या मुलांनी वेगवेगळे विषय हाताळले होते त्यामध्ये पवनचक्की, वायू प्रदुषण, जलप्रदूषण, स्वच्छ पाणी बनवण्याचे तंत्र, आकाशगंगा, रोबोट, आधुनिक शेती इत्यादी प्रकल्प सादर केले.मुलांनी विविध जिवंत प्रकल्प सादर केले होते.

पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांनी सादर केलेल्या प्रयोगांना उत्स्फूर्त दाद देऊन प्रोत्साहित केले. मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने पालकांना माहिती दिली. सगळ्यांनी मुलांचे खूप कौतुक केले. शाळेतील विविध प्रदर्शनामुळे मुलांमधील उपजत गुणांना वाव मिळतो. छोटी छोटी मुले पुढे जाऊन मोठे वैज्ञानिक होतात अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.