Bhosari: भोसरीतील रुग्णालय सुरु होईपर्यंत बाह्य रुग्णालय सुरु करा; महापौरांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारण्यात आलेल्या 100 खाट्यांच्या रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात बाह्य रुग्णालय सुरु करण्याची सूचना महापौर राहुल जाधव यांनी आयुक्तांना केली. तसेच रुग्णालयाबाबत महासभेने केलेल्या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. दरम्यान, बाह्यरुग्ण लवकरच सुरु केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले असल्याचे, महापौर जाधव म्हणाले.

महापौर राहुल जाधव यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची आज (मंगळवारी) भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भोसरीतील रुग्णालयाबाबत महासभेने घेतलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी होईपर्यंत, वैद्यकीय विभागातर्फे तेथे बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची सूचना केली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस उपस्थित होते.

  • महापालिकेतर्फे भोसरीत 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तथापि, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे वायसीएममध्ये पुरविल्या जाणा-या वैद्यकीय सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे हे रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर देखील करण्यात आला आहे. तथापि, रुग्णालय चालू होईपर्यंत बाह्य रुग्णालय सुरु केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.