Bhosari : इंद्रायणीनगरमध्ये एक पाऊल स्वच्छतेकडे

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर सेक्टर दोनमधील पोलीस लाईनमध्ये आज सकाळी सात ते अकरा वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात दोन ट्रक इतका कचरा काढण्यात आला आहे.

या अभियाना दरम्यान स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, वरीष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कुंटे, क्राईम पोलीस निरिक्षक नंदुरकर,  क्षेत्रीय अधिकारी दांगट, आरोग्य निरिक्षक सी. एस. भोसले आदी उपस्थित होते. या अभियानांमध्ये 40 कर्मचारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.