Bhosari : बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट चोरले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास सीताराम भागुजी लोंढे उद्यान येथे घडली.

मंगल अशोक सुतार (वय 34, रा. सीताराम भागुजी लोंढे उद्यान, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल यांनी त्यांचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट बाथरूममध्ये अडकवले. ते पेंडंट त्या तिथेच विसरल्या. काही वेळेनंतर त्यांच्या हे लक्षात आले असता त्यांनी बाथरूममध्ये जाऊन बघितले. मात्र, पेंडंट अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.