Bhosari : स्टोअर मॅनेजरने केली एअरटेल कंपनीची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती एअरटेल कंपनीचे जय गणेश साम्राज्य नगर भोसरी (Bhosari) येथे एअरटेल स्टोअर आहे. त्यामध्ये आरोपी नितीन हा स्टोअर मॅनेजर पदावर काम करतो.
कंपनीने त्याच्या ताब्यात दिलेल्या एअरटेल स्टोअर बँक खात्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून 1 लाख 100 रुपये काढून घेतले.
त्यानंतर जमा झालेल्या रोख रकमेतून 39 हजार 23 रुपये देखील काढून घेत कंपनीची एकूण1 लाख 39 हजार 123 रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.