Bhosari : आयएएस स्पर्धा पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; युवासेना भोसरी विधानसभेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – शिवसेना आणि युवासेना भोसरी विधानसभातर्फे आयएएस स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी परीक्षा घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

_MPC_DIR_MPU_II

बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी आणि शिवउद्योग प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयएएस स्पर्धा पूर्व तयारी परीक्षा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रातून 1000 विद्यार्थ्यांची त्यातून निवड करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीमध्ये विनामूल्य स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शिवसेना आणि युवासेना भोसरी विधानसभातर्फे पूर्व परीक्षा घेण्यात आली.

  • मोशी येथील गायत्री इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत 300 विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेनेचे आबा लांडगे सर्जेराव भोसले, विश्वनाथ टेमगिरे, योगेश जगताप, दत्तात्रय भालेराव, युवासेनेचे सूरज लांडगे, सचिन सानप, कुणाल जगनाडे, अमित शिंदे, कुणाल तापकीर, रूपेश कदम, किशोर शिंदे, हरीश कुदळे आदी उपस्थित होते. शारदा क्लासेसचे दिगंबर ढोकले यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.