Bhosari: पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची जाळून घेत आत्महत्या

Bhosari: Suicide by burning a woman after getting fed up with her husband's harassment आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तसेच आई वडिलांकडून पैसे घेऊन ये व माहेरच्या जमिनीत हिस्सा माग असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण करायचा

एमपीसी न्यूज – पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शिवाजीवाडी, मोशी येथे घडली.

याप्रकरणी महिलेच्या भाऊ संजय मल्हारी भुजबळ (वय 46, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी आरोपी जालिंदर नारायण बोराटे (वय 60, शिवाजीवाडी मोशी, ता. हवेली, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तसेच आई वडिलांकडून पैसे घेऊन ये व माहेरच्या जमिनीत हिस्सा माग असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण करायचा.

पतीच्या सततच्या होणाऱ्या मानसिक व शारिरिक जाचाला कंटाळून महिलेने रॅाकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.