Bhosari : सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे एस के आर्ट्सचे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले. यामध्ये सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते साठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

‘आपण करीत असलेले कार्य आणि कलाक्षेत्राची प्रामाणिक ओढ लक्षात घेऊन 2020 या वर्षासाठी आपली एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या अनुभवी नेतृत्वाखाली पुणे आणि जिल्ह्यातील नवोदित व सन्माननीय कलाकारांना संघटित करून त्यांना एस के आर्टस् बरोबर जोडून त्यांचा कलांना विकसित कराल’असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.