Bhosari : भोसरीतील सिंथेटिक ट्रॅकची काम रखडले, खेळाडूंची गैरसोय

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर (Bhosari) येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात कृत्रिम धावमार्ग (सिंथेटिक ट्रॅक) बदलण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. प्रशासनाने धावमार्ग सुरू करण्याचे जाहीर केलेले मुहूर्त अनेकदा हुकले आहेत. काम रखडल्याने शहरातील अॅथलेटिक्‍स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अॅथलेटिक्‍सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगर मधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणी चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम धावमार्ग आहे. अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धामुळे तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. क्रीडा स्थापत्य विभागाकडून सुरू असलेले हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे खेळाडूंना मैदानात प्रवेश बंद केला (Bhosari) असून त्यांना सराव करता येत नाही.

NEET Exam : नीट परीक्षा अर्ज प्रक्रियेला सुरुवात

कृत्रिम धावमार्ग बंद असल्याने खेळाडूंना यावर्षी झालेल्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी हाेता आले नाही. त्यामुळे खेळाडूंचे वर्ष वाया गेले असून शहराला पदके मिळू शकली नाहीत. – चंद्रकांत पाटील, सह सचिव, अॅथलेटिक्‍स जिल्हा संघटना

क्रीडा संकुलातील धावमार्गावर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत होते. धावमार्गावर सराव करता न आल्याने त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत आहे. आवश्‍यक साहित्य आणल्यानंतरच खराब धावमार्ग काढण्याचे काम करायला हवे होते, मात्र तसे न करता धावमार्ग काढून टाकल्याने काम कामाला विलंब झाला आहे. शहरात १५० राज्यस्तरी खेळाडू, तर ५० राष्ट्रीय खेळाडू आहेत. या खेळाडूंना पुण्यातील कृत्रिम धावमार्गावर सराव करावा लागतो. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक झळ बसत आहे. नियमित सराव नसल्याने कामगिरी ढासळत असल्याचे खेळाडू सांगत आहेत.

कृत्रिम धावमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम लवकर करण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत. कामास विलंब हाेत असल्यामुळे ठेकेदारावर दंडात्मकर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. – मनाेज सेठिया, सह शहर अभियंता स्थापत्य प्रकल्प विभाग

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.